जळगाव

Jalgaon : शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; शेतकऱ्यांना  पिक विम्याचे पैसे चार तारखेपर्यंत न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या नियोजित असलेल्या जळगाव जिल्हा दौऱ्यात काळे झेंडे दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे देण्यात आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असून केंद्र सरकार व राज्य सरकार ईडी कारवाईचा धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करीत आहे असा आरोप करीत या विरोधात आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

शेतकऱ्यांना 4 तारेखेपर्यंत पिक विम्याचे पैसे न दिल्यास मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्यावतीन काळे झेडे दाखविणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात सर्व सामान्य नागरिकांचे हिताचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार हे सतत लढत आहे. आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांवर ईडीच्या कारवाया केल्या जात आहेत. असा आरोप करीत सरकार हमसे डरती है, इडिको आगे करती है, या ईडी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.  आकाशवाणी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील व महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी, इजाज मलिक, उमेश पाटील, रिकू चौधरी, वंदना चौधरी, मंगला पाटील, विकासदादा पवार, वाल्मिकमामा पाटील, वाय एस महाजन, अशोक पाटील, इब्राहिम तडवी, प्रतिभा शिरसाट, राजु मोरे, नामदेव वाघ, किरण राजपूत, डॉ. संग्रामसिग सुर्यवशी, डॉ. रिजवान खाटीक, अशोक सोनवणे, रमेश पाटील, अकबर खान, सलिम ईमानदार, हूसेन शेख, रहिम तडवी, अमोल कोल्हे, नंईम खाटीक, रमेश बारे, भाऊसाहेब इगळे, राजेश गोयल, वर्षा राजपूत, शालिनी सोनवणे, शितल मशाणे, हरशाला पाटील, जयप्रकाश चांगरे, मतिन सैय्यद, अनिलभाऊ पाटील, चेतनभाऊ पवार, आकाश हिवाळे, धवन पाटील, अनिरुद्ध जाधव, रफिक शहा, आयाज शेख, पंकज तनपुरे, महाडीक सर, संजय चौव्हाण, बंशीर शहा, हरुण शेख इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT