आकाशवाणी चौकात पेट्रोल डिझेलचा दरवाढीत विरोधात रास्ता रोको करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस Pudhari News Network
जळगाव

जळगाव : इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रस्ता रोको

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रस्ता रोको आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सध्या कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर असूनही केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे बुधवार (दि.19) रोजी आकाशवाणी चौकात तीव्र निषेध नोंदवत रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.

कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 65.41 डॉलर असून एप्रिल 2021 नंतर ही सर्वात कमी पातळी आहे. रेटिंग एजन्सींनुसार तेल कंपन्या सध्या पेट्रोलवर प्रति लिटर 15-16 रुपये आणि डिझेलवर 6.12 रुपये नफा कमवत आहेत. तरीही गेल्या एका वर्षात दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारवर जनतेचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

“कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त – हेच का अच्छे दिन?”,

“पेट्रोलवर नफा, जनतेवर फटका – सरकारची धोरणं भटका!”,

“नफा कंपन्यांना, महागाई जनतेला – हेच का ‘सबका साथ’?”,

“दरवाढ रोज, नफा भरघोस – हे कुठलं धोरण?” आंदोलनाप्रंसगी अशा संतप्त घोषणा देत निषेध नाेंदवणण्यात आला.

युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, सुनील माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, नामदेव वाघ (ओबीसी सेल), डॉ. राहुल उदासी (डॉक्टर सेल), सरचिटणीस रहीम तडवी, आकाश हिवाळे (महानगर उपाध्यक्ष), चेतन पवार, साहिल पटेल, रफीक पटेल, योगेश साळी, संजय चव्हाण, मयूर पाटील, आबिद खान, अरबाज पटेल आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT