Crime News  File Photo
जळगाव

Jalgaon Crime | नशिराबादमध्ये घरातच गोवंशाची कत्तल; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कुरेशी मोहल्ल्यात पहाटे पोलिसांची धडक कारवाई; मांसासह दोघांना रंगेहात पकडले

पुढारी वृत्तसेवा

Nasirabad Cattle Slaughter

जळगाव : शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळ्याच्या एक दिवस आधी नशिराबाद शहरातील कुरेशी मोहल्ल्यात घरातच गोवंशाची अवैध कत्तल करून मांसाची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला. नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ९) पहाटे धडक कारवाई करत दोन संशयितांना गोवंशाच्या मांसासह रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना कुरेशी मोहल्ल्यातील एका घरात गोवंशाची कत्तल करून मांसाची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी पहाटे सुमारे ४.१५ वाजता संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी अकिल शेख आयुब कुरेशी (वय ३२) आणि असलम शेख आयुब पिंजारी (वय ३०, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, नशिराबाद) हे घरात गोवंशाची अवैध कत्तल करून विक्रीच्या उद्देशाने मांस बाळगताना आढळून आले.

या कारवाईनंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल लक्ष्मण महाजन (वय ४९, ब.नं. २७९५) यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७५, ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(सी), ९ आणि ९(ए) अन्वये गुन्हा रजि. नं. २५२/२०२६ नुसार कारवाई करण्यात आली.

सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरनारे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात सध्या शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT