जळगाव- शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये 57 वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना दि. १० रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा राजेश नवाल वय ५७ ही महिला वास्तव्याला आहे. त्यांचे पती राजेश नावाल हे दाना बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान दि. १० रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.