आमदार मंगेश चव्हाण व चाळीसगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Municipal Election : जिल्ह्यात मतदानाचा वेग वाढला; सकाळी 11.30 पर्यंत 16.60 टक्के मतदान

सार्वत्रिक निवडणुकीला शांततेत मतदान

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील १८ नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी आज (२ डिसेंबर) सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरुवातीला मतदानाची गती मंद होती. मात्र ११.३० वाजेपर्यंत टक्का सुधारून सरासरी १६.६० वर पोहोचला. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, एकूण ८ लाख ८१ हजार ५१० मतदारांपैकी १ लाख ४६ हजार ३५१ मतदारांनी मतदान केले. यात ७८,४०० पुरुष आणि ६७,९४१ महिला मतदारांचा समावेश आहे.

यावल आणि फैजपूरमध्ये उत्साह ११.३० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, यावल नगर परिषद हद्दीत सर्वाधिक २५.४५ टक्के मतदान झाले. फैजपूरमध्ये २४.२० टक्के तर एरंडोलमध्ये २१.८२ टक्के मतदान नोंदले गेले. रावेरमध्येही २० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले आहे.

भुसावळ आणि चाळीसगावमध्ये मध्यम प्रतिसाद

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या भुसावळ नगर परिषदेत (१ लाख ७८ हजार मतदार) १६.५७ टक्के मतदान झाले असून २९,६२० नागरिकांनी मताधिकार बजावला. चाळीसगावमध्ये १७.०३ टक्के आणि अमळनेरमध्ये १५.७९ टक्के मतदान झाले.

भडगाव आणि पाचोऱ्यात कमी प्रतिसाद

भडगावमध्ये मतदानाचा वेग सर्वात कमी असून ११.३० वाजेपर्यंत केवळ ८.९८ टक्के मतदान नोंदले गेले. पाचोरा (११.६८ टक्के) आणि सावदा (१३.०१ टक्के) येथेही मतदान मंद आहे. दुपारी गती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय मतदानाचा आढावा (७.३० ते ११.३० वाजेपर्यंत)

  • यावल – २५.४५ टक्के

  • फैजपूर – २४.२० टक्के

  • एरंडोल – २१.८२ टक्के

  • रावेर – २०.०२ टक्के

  • वरणगाव – १९.४७ टक्के

  • शेंदुर्णी – १८.९१ टक्के

  • धरणगाव – १८.७७ टक्के

  • चाळीसगाव – १७.०३ टक्के

  • पारोळा – १६.७६ टक्के

  • भुसावळ – १६.५७ टक्के

  • अमळनेर – १५.७९ टक्के

  • जामनेर – १५.५८ टक्के

  • नशिराबाद – १५.०५ टक्के

  • मुक्ताईनगर – १४.९७ टक्के

  • चोपडा – १४.०९ टक्के

  • सावदा – १३.०१ टक्के

  • पाचोरा – ११.६८ टक्के

  • भडगाव – ८.९८ टक्के

एकूण सरासरी मतदान : १६.६० टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT