जळगाव शहर महानगरपालिका  Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Municipal Election Reservation : 19 प्रभागांचे आरक्षण जाहीर, महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व

जळगाव महापालिका निवडणूक 2025 :

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आगामी जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रभाग क्रमांक १ ते १९ साठी जाहीर झालेल्या आरक्षण तक्त्यानुसार महिलांना ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. या आरक्षणामुळे शहराच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी (दि.11) रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी सभागृहात होती.

सोडत संपल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून अनेक प्रस्थापित नगरसेवकांना प्रभाग बदलावे लागणार आहेत. काही प्रभागांत नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

महिलांचे वर्चस्व

१९ पैकी ११ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जागांचा समावेश आहे. महिलांसाठी आरक्षण वाढल्याने अनेक पक्षांकडून महिला उमेदवारांच्या शोधाला वेग आला आहे.

ओबीसी प्रवर्गाचा मजबूत सहभाग

आरक्षणात ओबीसी प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणात जागा निश्चित झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश महिला उमेदवारांसाठी आहेत. त्यामुळे या वर्गातील महिलांना राजकारणात प्रवेश मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

नव्या रचनेत बदल

या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याने काहींना नवीन प्रभाग शोधावे लागतील, तर काही नेत्यांना आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांना उमेदवारी द्यावी लागू शकते.

  • १९ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये ‘ड’ गट सर्वसाधारण.

  • प्रभाग ३, ११ आणि १८ मध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण.

  • महिला उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी.

  • काही प्रभागांमध्ये संभाव्य बंडखोरीचे संकेत.

प्रभागनिहाय आरक्षण असे...

(प्रत्येक प्रभागात चार सदस्य – अ, ब, क, ड गट असे आहेत)

  • प्रभाग १: एससी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग २: एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग ३: एससी महिला, एसटी महिला, ओबीसी, सर्वसाधारण

  • प्रभाग ४: एससी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग ५: ओबीसी, सर्वसाधारण महिला (२), सर्वसाधारण

  • प्रभाग ६: ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण (२)

  • प्रभाग ७: ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण (२)

  • प्रभाग ८: ओबीसी, सर्वसाधारण महिला (२), सर्वसाधारण

  • प्रभाग ९: ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण (२)

  • प्रभाग १०: एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग ११: एसटी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग १२: एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

  • प्रभाग १३: ओबीसी, सर्वसाधारण महिला (२), सर्वसाधारण

  • प्रभाग १४: ओबीसी, सर्वसाधारण महिला (२), सर्वसाधारण

  • प्रभाग १५: ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण (२)

  • प्रभाग १६: ओबीसी, सर्वसाधारण महिला (२), सर्वसाधारण

  • प्रभाग १७: ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण (२)

  • प्रभाग १८: एसटी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला

  • प्रभाग १९: ओबीसी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

या नव्या आरक्षण तक्त्यामुळे जळगावच्या राजकारणात ताज्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत. महिलांचे वाढते प्रतिनिधित्व आणि ओबीसी प्रवर्गातील संधींमुळे निवडणूक पूर्वसंध्येला नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT