जळगाव : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत छाननीनंतर नगरसेवक पदासाठी 2,257 अर्ज करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी 139 अर्ज होते. माघारीच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 582 अर्जदारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 54 अर्जांची माघार झाल्याने आता नगराध्यक्षपदाच्या रिंगणात 77 उमेदवार उरले आहेत तर नगरसेवक पदासाठी 1,555 उमेदवार रिंगणात आहेत.
नगरसेवक पदासाठी मागे घेतलेल्या 582 अर्जांपैकी भुसावळ 76, अंमळनेर 50, चाळीसगाव 72, चोपडा 35, जामनेर 14, यावल 10, नशिराबाद 22, वरणगाव 13, पारोळा 13, भडगाव 14, धरणगाव 100, सावदा 27, रावेर 52, एरंडोल 19, फैजपूर 34, शेंदुर्णी 5 आणि मुक्ताईनगर 9 असे अर्जांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मागे घेतलेल्या 54 अर्जांमध्ये भुसावळ 2, अंमळनेर 8, चाळीसगाव 1, चोपडा 1, जामनेर 0, पाचोरा 1, यावल 2, नशिराबाद 4, वरणगाव 2, पारोळा 0, भडगाव 1, धरणगाव 9, सावदा 2, रावेर 8, एरंडोल 1, फैजपूर 3, शेंदुर्णी 6 आणि मुक्ताईनगर 3 अर्जांचा समावेश आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी एकूण 77 उमेदवार राहिले आहेत. मुक्ताईनगर आणि पाचोरा येथे दोनच उमेदवार आहेत. पारोळा, भडगाव आणि धरणगाव येथे तिघांची लढत आहे. भुसावळमध्ये मात्र आठ उमेदवार रिंगणात असल्याने तेथील राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.