जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच शिवसेनेने विजयाचा नारळ फोडला. आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे. अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी गुरुवारी (दि. १) आपली उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे मनोज चौधरी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर प्रभाग क्रमांक 9 ब च्या शिवसेनेचे उमेदवार प्रतिभा गजानन देशमुख या बिनविरोध निवड झाली आहे
जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ (अ) या अनुसूचित जमाती (ST) राखीव मतदारसंघात अखेर शिवसेनेने विजयाची मोहोर उमटवली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
छाननीच्या वेळी मयूर सोनवणे आणि गौरव सोनवणे यांच्यात चुरस निर्माण होईल असे चित्र होते, मात्र मयूर यांच्या माघारीमुळे शिवसेनेची ही पहिली जागा बिनविरोध निवडून आली आहे. प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या गौरव सोनवणे यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पहिले यश मिळाले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने जळगाव महानगरपालिका निवडणुकीत दुसरे यश संपादन केले. प्रभाग क्रमांक ९ (अ) मध्ये अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी गुरुवारी (दि. १) आपली उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे मनोज चौधरी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रभागात लोखंडे आणि चौधरी यांच्यात थेट लढत अपेक्षित होती, मात्र लोखंडे यांच्या माघारीमुळे निवडणूक एकतर्फी झाली. प्रशासनाकडून याची अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशी केली जाणार आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 ब च्या शिवसेनेचे उमेदवार प्रतिभा गजानन देशमुख या बिनविरोध निवड झाली आहे याची अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशी होणार आहे आज दिवसभरात शिवसेनेचा तिसरा उमेदवार हा बिनविरोध झाला आहे
जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याचा सपाटा लागलेला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये असलेले उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतिभा गजानन देशमुख यांच्या समोरील अपक्ष उमेदवाराने प्रतिभा सुधीर पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत