Maharashtra Legislative Council election
जळगाव: महाराष्ट्र विधान परिषद दिवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा झाली. सोमवारपासून (दि.१८) ते दि. २५ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
आचारसंहितेनुसार कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना पोस्टर्स लावणे, भित्तीलेखन करणे, निवडणूक चिन्हे काढणे, कापडी फलक किंवा झेंडे लावणे तसेच इतर कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित व्यक्ती पात्र असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.