Sugar pudhari photo
जळगाव

Sugar Price Drop | सर्वसामान्यांना मोठा दिलासा; जळगावात साखरेचा दर ७५ वरून ७० रुपयांवर

एक्सपोर्ट ड्युटी शून्यावर आल्याने दरात घसरण; सट्टेबाज व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Market Sugar Price Drop

जळगाव: गेल्या दोन-तीन दिवसांत साखरेचे दर ५० रुपयांवरून थेट ७५ रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाकघरातील बजेट पार कोलमडले होते. मात्र, केंद्र सरकारने साखरेवरील एक्सपोर्ट ड्युटी (निर्यात शुल्क) शून्य केल्यामुळे आता जळगावच्या बाजारपेठेत साखरेचे दर ५ रुपयांनी घसरले आहेत. ७५ रुपयांवर गेलेली साखर आता किरकोळ बाजारात ७० रुपये प्रति किलोवर आली असून होलसेल मार्केटमध्ये दर ६६ रुपयांवर स्थिरावले आहेत.

एक्सपोर्ट ड्युटीचा असा झाला परिणाम:

किरकोळ बाजार दर: ७५ वरून ₹७० प्रति किलो ( ५ ने घट)

घाऊक (होलसेल) दर: ६६ प्रति किलो

सट्टेबाजांना फटका: भाव वाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा (स्टॉक) करून ठेवणाऱ्या सट्टेबाज व्यापाऱ्यांना आता ड्युटी शून्यावर आल्याने माल बाजारात काढणे भाग पडत आहे. यामुळे काळ्या बाजारालाही मोठा आळा बसला आहे.

कच्च्या साखरेवरील एक्सपोर्ट ड्युटी सरकारने शून्य केल्याने होलसेल मार्केटमध्ये साखरेचे भाव ४ ते ५ रुपयांनी कमी झाले आहेत. दर वाढतील या अपेक्षेने ज्या व्यापाऱ्यांनी साठा केला होता, त्यांनाही आता माल विक्रीस काढावा लागत आहे.
— सतीश चांदवाडी (होलसेल व्यापारी, जळगाव)
गेल्या ४-५ दिवसांतील अनपेक्षित दरवाढीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. दर अचानक ७५ रुपयांवर गेल्याने ग्राहकांनीही गोड साखरेकडे पाठ फिरवली होती. आता भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
— पिंटू कोठारी (संचालक, साई जीवनमॉल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT