जळगाव

जळगाव : भाजपाच्या विधानसभा क्षेत्रातूनच लोकसभेच्या निकालात कमी मताधिक्य

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – रावेर लोकसभेमध्ये 24 उमेदवारांना 4100 मतदारांनी नोटाचा वापर नाकारले आहे. यामध्ये सर्वाधिक भुसावळ विधानसभा क्षेत्रातून 790, चोपडा 736, जामनेर 680 असा नोटांचा वापर करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवाराला लाखाची लीड देणाऱ्या जामनेर मधून 36 हजार, 680 चा लीड मिळाला आहे. भुसावळ मधून 41460 चा लीड मिळाला आहे. येथील दोन्ही ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार व नामदार स्थायिक आहेत.

रावेर लोकसभेमधून रक्षा खडसे यांना विजयश्री मिळाला आहे. मात्र रक्षा यांना लाखाचा लीड मिळवून देऊ असे म्हणणारे गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातून फक्त 36 हजार 680 चा लीड मिळालेला आहे. भुसावळ या ठिकाणावरून 41460 मते भाजपच्या उमेदवाराला देण्यात नामदार गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांना यश मिळाले आहे. मुक्ताईनगर हे खडसे परिवार व चंद्रकांत पाटील यांच्यातील सर्वसामान्य माहीतीतील आहेत. असे असतानाही मुक्ताईनगर मधून 46 हजार 929 मिळालेला आहे. मलकापूर मधून 47 हजार मते मिळाली आहेत. चोपडा मधून सर्वाधिक 63 हजार 642 मताधिक्य मिळाले आहे.  रावेरमधून 35 हजार 731 चे मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहेत.

येथे झाला नोटाचा वापर

  • चोपडा  ३३६
  • रावेर 616
  • भुसावळ विधानसभा क्षेत्रात 790
  • जामनेर विधानसभा क्षेत्रात 680
  • मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र ६४०
  • मलकापूर विधानसभा क्षेत्रात 617
  • एकूण 473
  • टपालाने 27
  • एकूण चार हजार 100 मतदारांनी २४ उमेदवारांना नोटांचा वापर करून नाकारले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT