जळगाव

Jalgaon Lok Sabha 2024 | यावेळी चूक मुक्त निवडणूक घेण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा– 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये म्हणून यावर्षी चूक मुक्त निवडणूक घेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यासाठी थेअरी पेक्षा प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे चुका होत नाही असे मत जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यात पहिले प्रशिक्षण पार पडले आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये म्हणून प्रात्यक्षिकवर भर देण्यात येत आहे.  उमेदवारांसाठी दर निश्चिती करण्यात आली आहे. गेल्या वेळच्या दरांमध्ये या दरांमध्ये काही सोशल सेलिब्रिटी यांच्यासाठीही दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच यावेळी नॉमिनेशन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वकील व इतर लोकांनाही प्रशिक्षण व त्यांच्या शंका कुशकांचे निरासन करण्यात आलेले आहेत. तसेच या प्रशिक्षणामध्ये सात प्रकारचे ट्रेनिंग टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आले. यात अध्यापन चर्चासत्र शंका निरसन, ग्रुप वॉक ड्राल, तोंडी प्रश्न, याचबरोबर गुगलवर 135 गुणांची परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये आतापर्यंत बाराशे लोकांनी परीक्षा दिलेली आहे. यामध्ये 46 पासून 203 गुण मिळालेले कर्मचारी व अधिकारी आहेत. 9 तारीख ही परीक्षेची शेवटची तारीख आहे आणि प्रत्येकाला हा पेपर सबमिट करायचं असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये ताबूला रस्सा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दोन लाखापेक्षा जास्त पहिल्यांदा वोटिंग करणारे मतदार आहे. महिलांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच दिव्यांग जेष्ठ नागरिक यांचेही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच यावर्षी 75 ते 85 टक्के मतदान होणाऱ्यांना कास्यपदक, 85 ते 95 टक्के मतदानाला रौप्य पदक, 95 ते 100% मतदान झाल्यास गोल्ड पदक देण्यात येणार आहे. तसेच तेथे त्यांनी वार्डामध्ये फलक लावण्यात येणार आहे.

तसेच नगरपालिकेच्या दर्शनीय भागामध्ये प्रत्येक नगरपालिका वार्डामध्ये बारकोड लावण्यात येणार आहे. या बारकोडच्या माध्यमातून मतदारांना किंवा नागरिकांना आपले मतदान कोठे आहे याची माहिती होणार आहे.

2014 मध्ये
राष्ट्रीय मतदान टक्केवारी 66.40 टक्के
राज्याचे मतदान 60.42 टक्के
जळगाव शहराचे मतदान 47.10टक्के
रावेर लोकसभा मतदार 61.77 टक्के ,
जळगाव लोकसभा मतदार 55.09 टक्के

2019 मध्ये
राष्ट्रीय मतदान टक्केवारी 67 टक्के
राज्याचे मतदान 61.02 टक्के
जळगाव शहराचे मतदान 49.14 टक्के
रावेर लोकसभा मतदार 61.40 टक्के ,
जळगाव लोकसभा मतदार 56.11 टक्के

हेही वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT