भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एलसीबीकडून आरोपीला व गावठी कट्टा व आठ काडतूससह अटक करण्यात आली आहे. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : गावठी कट्टा बाळगणारा एल सी बी कडुन अटक

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका व्यक्तीकडे गावठी कट्टा व आठ जिवंत काडतूस असल्याची माहिती आणि गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपीला व गावठी कट्टा व आठ काडतूससह अटक करण्यात आली आहे.

जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास दिले.

त्यानुसार पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहीतीच्या आधारे वरणगाव शहरातील राज उर्फ मनोज याच्या जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सांगितली. त्याआधारे पोलीस हवालदार प्रितम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने तत्काळ राज उर्फ मनोज रा. वरणगांव याला ताब्यात घेतले.

राज उर्फ मनोज यास वरणगांव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकाना जवळ मिळून आला. आरोपी राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (वय ३९, रा. रामपेठ वरणगांव ह.मु. शिवराय चौक फुलगांव वरणगांव ता. भुसावळ) याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपयाची किमतीचा एक गावठी बनावठीची पिस्टल व ८ हजार रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुध्द वरणगाव पोलीस स्टेशन येथे १६५/२०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर, राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची कारवाई करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT