जळगाव : जमिनीच्या फेरफार जमिनीचे उतारे नोंदी अपील यासारख्या गोष्टींसाठी भूमी अभिलेख कार्यालयाला चकरा मारावे लागत होत्या. भूमी अभिलेखन कार्यालय आता ऑनलाईन झाल्यामुळे तक्रारीच्या सुनावण्या ही ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर तक्रारदारांना नाशिकला येण्याची गरज नाही त्यांना तालुक्याच्या कार्यालयातच येऊन ऑनलाईन सुनावणी अशी माहिती उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश महेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक दुपारी 12.00 वाजता भूमी अभिलेख विभागातील सर्व ऑनलाईन सेवा उदारणार्थ ई मोजणी, ई रेकॉर्ड, ई फेरफार, भुनकाशा, व लॅंड रेकॉर्ड डिजिटईझशन बाबत या सर्व संबंधित योजनेबाबत, भूमि अभिलेख एक पाऊल पुढे या अंतर्गत 'जमीन तुमची जबाबदारी आमची' या संकल्पनेने भूमी अभिलेख ऑनलाईन करण्यात आलेल्या सेवांबद्दल माहिती देण्यासाठी उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.
यावेळी सातबारा उतारा, ८अ उतारा, फेरफार प्रत, चावडीवरील नोटीसा मालमत्ता पत्रक इत्यादी नकला तसेच जमिनीसंबंधी नकाशे डाऊनलोड करण्यासाठी वारस नोंदीचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी, अपील प्रकरणी माहिती मिळवण्यासाठी, तक्रारी करण्यासाठी या सर्वांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आलेला आहे. या सेवांच्या माध्यमातून नागरिकांना ९० दिवसाच्या सेवा सुविधा देण्याचे भूमी अभिलेखाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमी अभिलेख संपूर्ण ऑटो मोडवर झालेले आहे. व्हर्जन टू या माध्यमातून संपूर्ण कार्यालय ऑनलाईन झालेले आहेत. तसेच कार्यालयातील असलेल्या डॉक्युमेंट्स व दप्तर हे संपूर्णपणे स्कॅन झालेला आहे. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्या किंवा जमीन धारकाला आपली मोजणी कोणत्या महिन्यात पाहिजे आहे. त्याच्या इच्छेनुसार तेही निवडता येणार आहे. सातबारा किंवा मोजणीसाठी कार्यालयात चकरा मारण्याची आता गरज राहिलेली नाही.
मोजणी करण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणी फोटो अपलोड करण्यात येतात त्यामुळे पारदर्शकता निर्माण होते. मात्र, या फोटोंना झी टॉकीजची सुविधा अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. नकाशाचे कामे ७० टक्के झाले असल्यामुळे लवकरच ते शंभर टक्के झाल्याने नकाशेही ई चावडीच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
या ऑनलाईनच्या माध्यमातून आता तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला नाशिकला सेनेसाठी येण्याची गरज लागणार नाही व त्याच्या संबंधित तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन तिथे उपस्थित राहून ऑनलाईन सोनवणे उपस्थित राहू शकतो अशी माहिती उपसंचालक भूमि अभिलेख महेश इंगळे यांनी दिली.