जळगाव : महापालिकेमध्ये दिग्गज नेत्यांच्या मुलांनी आपली राजकीय कारकीर्द विजयाच्या जल्लोषाने सुरू केली आहे. यामध्ये आमदार सुरेश भोळे, शिवसेनेचे आमदार डॉ. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह त्यांची आई व मुलगा यांनी विजयाचा गुलाल उधळला.
विद्यमान आमदार सुरेश भोळे यांचे सुपुत्र विशाल हे प्रभाग 7 क मधून बिनविरोध विजयी झाले आहेत. माजी महापौर भारती सोनवणे व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचे पुत्र सोनवणे कल्पेश प्रभाग 4 क मधून विजयी झालेले आहेत. तर 5 ब मधून मुलगी प्रतीक्षा, तर 18 अ मधून डॉ. गौरव सोनवणे हे शिवसेनेच्या तिकिटावर बिनविरोध झालेले आहेत. तर 11 अ मधून डॉक्टर अमृता सोनवणे या विजयी झालेल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र प्रफुल्ल हे प्रभाग 13 मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेले आहेत.
शिंदे सेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक4 मधून पीयूष ललित कोल्हे यांनी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते विजयी झालेले आहेत. 11 क मध्ये सिंधू कोल्हे, 11 ड मधून ललित कोल्हे हे एकाच परिवारातील आजी, मुलगा आणि नातू विजयी झालेले आहेत. विशेष म्हणजे ललित कोल्हे हे एका गुन्ह्याप्रकरणी नाशिकला तुरुंगात अटकेत आहेत.