Jalgaon Jamner Accident Pudhari
जळगाव

Jalgaon Accident | काळाचा घाला! एकाच दुचाकीवरून निघालेले ६ जण ट्रकच्या धडकेत जागीच ठार; जामनेरजवळील थरारक घटना

मालदाभाडी शिवारात ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक; परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Jamner Accident

जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अवघ्या तीन महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. १५) घडलेल्या या दुर्घटनेत दोन पुरुष, एक महिला आणि तीन बालकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालदाभाडी शिवारातील मुख्य रस्त्यावर मालवाहू ट्रक (क्रमांक एचआर ५५ एके ५२३२) आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याने या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सहाही जणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जामनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीवरील प्रवासी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या दिशेने जात होते. मृतांची नावे आणि त्यांची निश्चित ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या भीषण अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, एका दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT