तापी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करताना ग्रामस्‍थ  Pudhari Photo
जळगाव

Jalgoan News | प्रलंबित पुनर्वसनाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन

पुनर्वसन मंजूर अंमलबजावणी नाही, तापी नदीपात्रात आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील गावकऱ्यांनी तब्बल 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज तीव्र आंदोलनाचे रूप घेतले. पुनर्वसन मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी तापी नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले.

या आंदोलनात शंभरहून अधिक शेतकरी, महिलांचा मोठा सहभाग आणि वयोवृद्ध नागरिकांनी देखील उपस्थिती लावली. गावकऱ्यांनी हातात फलक घेऊन नदी पात्रात शांततेत आंदोलन सुरू केले असले, तरी प्रशासनाने अद्याप घटनास्थळी हजेरी न लावल्यामुळे गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहचला आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान चार नागरिकांना भोवळ आल्याची घटना घडली. या शेतकऱ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये क्षणभर घबराट पसरली होती.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 26 वर्षांपूर्वीच पुनर्वसन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे गावकरी आजही त्या जुन्या अडचणींमध्ये अडकून आहेत. पावसाळ्यात गावात पुराचा धोका कायम असतो, त्यामुळे अनेकदा जीव धोक्यात घालावा लागतो. यावर ठोस उपाय म्हणून पुनर्वसन त्वरित व्हावे, ही गावकऱ्यांची मागणी आहे.

"जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील," असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या आंदोलनाकडे अद्यापही जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, ही खेदाची बाब आहे. गावकऱ्यांच्या या जलसमाधी आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची तातडीने दखल घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलक ग्रामस्थांनी सांगितले की, "आमच्या घरांचे पुनर्वसन न झाल्यामुळे आम्हाला कित्येक वर्षे हाल सहन करावे लागत आहेत. प्रशासनाने फक्त आश्वासनाची पूर्तता केली. आता आम्ही जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन निर्णय घेईपर्यंत नदीतून बाहेर पडणार नाही." घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असून, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ सुरू झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT