सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते सहायक जळगाव महापालिका आयुक्त योगेश पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  Pudhari News Network
जळगाव

Jalgaon | शंभर दिवसांच्या सुधारणा मोहिमेत जळगावचा समाज कल्याण विभाग आघाडीवर

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते जळगाव कार्यालयाचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : राज्य शासनाच्या "१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" अंतर्गत, जळगाव येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

उल्लेखनीय यशाबद्दल पुणे येथील यशदा संस्थेमध्ये शनिवार (दि.३१) रोजी आयोजित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते सहायक जळगाव महापालिका आयुक्त योगेश पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.) आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते.

शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. विविध निकषांवर मूल्यांकन करून ही निवड करण्यात आली. यामध्ये कार्यक्षम कारभार, वेळेवर योजना अंमलबजावणी, तांत्रिक साधनांचा वापर आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई यांचा समावेश होता.

जळगावच्या समाज कल्याण कार्यालयाने सेवा वितरणात नवकल्पना राबवून, डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर करून आणि लोकाभिमुख दृष्टिकोन अंगीकारून राज्यात आघाडी घेतली. या यशाबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. हे यश म्हणजे कार्यालयातील संघटित प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि सेवाभावाचे फलित असल्याचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाच्या या उपक्रमातून शासकीय यंत्रणांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि जळगावची यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मंत्री शिरसाठ यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT