जळगाव : जळगाव जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी 100 टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करत राज्यात कामगिरी अधोरेखित केली आहे. 2023-24 आणि 2024-25 या दोन आर्थिक वर्षांमध्ये जमीन व गौण खनिज विभागांतून मिळालेली महसूल वसुली अनुक्रमे 108.47 टक्के आणि 119.09 टक्के इतकी झाली आहे.
2022-23 मध्ये जमीन महसूलाची वसुली 76.21टक्के इतकी झाली होती. मात्र 2023-24 मध्ये ती 100.15 टक्के वर पोहोचली, तर 2024-25 मध्ये तब्बल 122.65 टक्के इतकी झाली आहे.
गौण खनिज वसुलीमध्ये 2022-23 मध्येच 102.24 टक्के टक्केवारी पार केली होती. पुढे 2023-24 मध्ये 115.07 टक्के आणि 2024-25 मध्ये 117.48 टक्के इतकी उच्चांक वसुली झाली.
2022-23: उद्दिष्ट ₹12,882 कोटी, वसुली ₹11,712.54 कोटी (90.92 टक्के)
2023-24: उद्दिष्ट ₹14,570 कोटी, वसुली ₹15,803.49 कोटी (108.47 टक्के)
2024-25: उद्दिष्ट ₹13,790.35 कोटी, वसुली ₹16,422.51 कोटी (119.09 टक्के)
2023-24 मध्ये एकूण महसूल वसुलीत 2022-23 च्या तुलनेत 34.92 टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर खनिज महसूल वसुलीत 49.91 टक्के वाढ झाल्याची नोंद आहे. जळगाव जिल्ह्याची खनिज वसुली प्रथमच 100 कोटींच्या पुढे गेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपाययोजनांमुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेची ही कामगिरी राज्यभरात कौतुकास्पद ठरत आहे.