प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने दौरे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांची विचारपूस केली.  (Pudhari Photo)
जळगाव

Jalgaon Heavy Rain | जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; घरांचे, पिकांचे मोठे नुकसान

पाचोरा तालुक्यातील अनेक गावे बाधित

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon rainfall damage

जळगाव : जिल्ह्यात 16 व 17 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसासह विजेच्या तडाख्यामुळे शेतपिकांचे, घरांचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले. रावेर, अमळनेर, भडगाव, जळगाव, पारोळा, एरंडोल, बोदवड आणि पाचोरा तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली आहेत.

पूर व वादळी पावसामुळे काही ठिकाणी घरांचे छत कोसळले, तर बक्षीपुर येथे भिंत कोसळून सात ते आठ शेळ्यांचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यात पातोंडा व नांद्री गावात पुराचे पाणी शिरल्याने बाधित कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत व स्थानिक भवनात स्थलांतरित करण्यात आले. प्रशासनाने त्यांच्या निवास व अन्नाची तातडीने व्यवस्था केली आहे.

भडगाव व जळगाव तालुक्यात कपाशी, ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बोदवड तालुक्यात झाड कोसळून एका घराचे नुकसान झाले. पाचोरा तालुक्यातील लासगाव व सामनेर भागातही शेतीचे नुकसान झाले आहे.

प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने दौरे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांची विचारपूस केली. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले असून शासकीय मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया जलदगतीने राबवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT