जळगाव : राज्यासह जिल्ह्यातही गुरुवार (दि.14) पासून पाऊस होत असून गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 13 हजार 217 शेतकरी बाधित झाले आहे.
जिल्ह्यात शुक्रवार (दि.15) व शनिवार (दि.16) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण 208 गावे बाधित झाली असून 13 हजार 217 शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. तर 10 हजार 196.68 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली.
अतिवृष्टीमुळे तालुकानिहाय झालेल्या नुकसानीचा तपशील असा...
एरंडोल तालुक्यात 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे 65 गावांमधील 8139 शेतकरी बाधित झाले असून सोयाबीन 831 मका 217 ज्वारी 34 कापूस 27 71 मुंग उडीद 372 इतर 280 ऊस 2, केळी 70 हेक्टर असे एकूण 6537 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पारोळा या तालुक्यात 15 व 16 रोजी झालेल्या पावसामुळे सतरा गावांमधील 1293 शेतकरी बाधित झाले असून मका 270 कापूस 814 भाजीपाला आठ इतर 24 असे एकूण 1116 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
चोपडा या तालुक्यात 15 व 16 रोजी झालेल्या पावसामुळे 29 गावातील 1347 शेतकरी बाधित झाल्या असून मका १०२४ कापूस वीस मूडी चार केळी 33 असे एकूण 1081 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
धरणगाव तालुक्यात 15 रोजी झालेल्या पावसामुळे 80 गावातील १९८६ शेतकरी बाधित झाली असून मका 655 ज्वारी बाजरी 42 कापूस 180 इतर पिके 232 फळपिके 72 असे एकूण 1181 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे
पाचोरा 16 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे गावातील 214 शेतकरी बाधित झाले असून मका 118 कापूस 37 असे 155 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे
जामनेर तालुक्यात शनिवार (दि.16) आलेल्या पावसामुळे पाच गावातील 220 शेतकरी बाधित झाले असून मका 40 कापूस 62 असे 109 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे
जळगाव तालुक्यात 15 रोजी झालेल्या पावसामुळे तीन गावांमधील 16 शेतकरी बाधित झाले असून सोयाबीन साथ केडी पाच फळपिके चार असे एकूण 16 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे
भडगाव तालुक्यात 15 रोजी झालेल्या पावसामुळे एका गावातील एक शेतकरी बाधित झाला असून ऊस 0.68 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे
अमळनेर तालुक्यात 15 रोजी झालेल्या पावसामुळे एका गावातील एक शेतकरी बाधित झाला असून एक हेक्टर वरील उसाचे नुकसान झालेले आहे.
जळगाव जिल्ह्यात झालेल्या 15 व 16 रोजी पावसामुळे 208 गावे बाधित झालेले असून या गावांमधील 13217 शेतकरी बाधित झाले आहे. यामध्ये सोयाबीन 838 मका 4284 ज्वारी बाजरी 76 कापूस 3884 मुंग उडीद 383, भाजीपाला आठ इतर पिके 536 पोस्ट 3.68 केळी 108 फळपीके 76 असे एकूण 10196.68 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.