जळगाव : दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून धरण प्रशासनाने सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. यामुळे धरणातून सध्या 6357 क्युसेक्स (180 क्युमेक्स) वेगाने विसर्ग सुरू आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवार (दि.8) रोजी एकूण 172.4 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान 19.2 मिमी इतके होते. तर बुधवार (दि.9) रोजी पाणलोट क्षेत्रात एकूण 111.0 मिमी, तर सरासरी 12.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
टेक्सा – 45.0
चिखलदरा – 43.0
लखपुरी – 18.8
अकोला – 18.4
लोहारा – 16.4
गोपालखेडा – 13.2
देढतलाई – 11.2
एरडी – 2.4
बऱ्हाणपूर – 4.0
टेक्सा – 31.8
लोहारा – 21.2
अकोला – 15.4
चिखलदरा – 13.8
लखपुरी – 12.8
गोपालखेडा – 4.2
देढतलाई – 5.4
एरडी – 3.0
बऱ्हाणपूर – 3.4
पाणी पातळी – 210.450 मीटर
एकूण साठा – 212.00 दलघमी
साठा टक्केवारी – 54.64%
विसर्ग – 180 क्युमेक्स (6357 क्युसेक्स)
दरवाजे – 6 दरवाजे 0.50 मीटरने उघडे
तापी आणि पूर्णा नद्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, धरण जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.