हतनूरचे 22 दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा  pudhari photo
जळगाव

Jalgaon Hatnur Dam | हतनूर धरणाचे 22 दरवाजे उघडले; 42661 क्युसेस पाण्याचा विसर्ग

परिसरातील गावांना, नदीकाठच्या रहिवांशाना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, धरणाचे 22 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. रविवार (दि.27) रोजी दुपारी 3 वाजेपासून 42661 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हातनूर धरण हे तापी व पूर्णा नदीवर वसलेले असून, जळगाव जिल्ह्यातील सिंचन, वीज निर्मिती आणि पाणीपुरवठा या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 27 जुलै रोजी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे.

रविवार (दि.27) रोजीचा धरण विसर्ग असा...

  • सकाळी 8 वाजता: 18 दरवाजे 1 मीटरने उघडले गेले होते आणि 34326 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

  • सकाळी 10 वाजता: दरवाजांची संख्या 20 करण्यात आली, आणि विसर्ग वाढून 38140 क्युसेस झाला.

  • दुपारी 3 वाजता: 22 दरवाजे उघडले गेले असून, 42661 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रविवार (दि.27) रोजी पावसाची नोंद (24 तासांत):

  • टेक्सा – 67.8 मिमी

  • चिखलदरा – 61.6 मिमी

  • देढतलाई – 21.4 मिमी

  • इतर ठिकाणी एकूण = 191.2 मिमी, सरासरी = 21.2 मिमी

  • सध्याची जलपातळी (27 जुलै, दुपारी 3 वाजता):

  • वॉटर लेव्हल: 210.690 मी.

  • जलाशयाची पूर्ण लेव्हल: 214.000 मी.

  • ग्रॉस स्टोरेज: 221.60 मिमी (57.11 टक्के)

  • लेव्हल स्टोरेज: 88.60 मिमी (34.75 टक्के)

  • रेडियल गेट विसर्ग: 1208 क्युमेक्स (42661 क्युसेक)

  • कॅनॉल डिस्चार्ज: 2.83 क्युमेक्स (100 क्युसेक)

जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतत धरण आणि पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT