जळगाव

Jalgaon Hailstorm : 215 गावांना गारपिटीचा फटका, 18 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गणेश सोनवणे

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्याला (दि. 26) रात्री गारपिटीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव, चोपडा या भागात अवकाळी पावसासह व गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तब्बल 18 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून 215 गावातील 21 हजार 67 शेतकरी बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.

कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात (दि. 26) रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटमध्ये गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, तीळ, कांदा, भाजीपाला, केळी, पपई, फडफिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्रामुख्याने जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव, चोपडा या सहा तालुक्यांतील शेतीपिकांचे सर्वांधिक नुकसान झाले. चाळीसगाव बत्तीस गावे 5652 शेतकरी, भडगाव तेरागावे 173 शेतकरी, अमळनेर 65 गावे 2538 शेतकरी, पारोळा 48 गावे 7200 शेतकरी, धरणगाव 16 गावे 354 शेतकरी, चोपडा 41 गावे 5150 शेतकरी असे एकूण 215 गावांमधील 21067 शेतकरी बाधित झाले आहे.

तर या 6 तालुक्यातील मधील गहू १९८३.५० हेक्टर, मका 5442.50, ज्वारी ५०९४.४१, बाजरी 2081.४०, हरभरा 2499.50, तीळ 15, कांदा 848, भाजीपाला 468, केळी 37, पपई 31.50, फळपिके 375.70 असे एकूण 18875.51 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT