जळगाव

जळगाव | जिल्ह्यातील घरकुलाच्या कामाचा शुभारंभ

जि. प सीईओंच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | जिल्ह्यामधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टप्पा दोन मध्ये ज्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे, त्यांच्या घराचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या हस्ते नारळ फोडून घराचे काम सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या उपस्थितीमध्ये घरकुलाचे काम सुरू केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा २ सन २०२४-२७ या वर्षात जळगांव जिल्ह्यात ८७१२० इतके घरकुले मंजुर करण्यांत आलेले आहे. २२ फेब्रुवारी रोजी केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पूणे येथून जळगांव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये ६९६६७ इतक्या लोकांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जळगांव जिल्हयांतील नुकतीच एकाच वेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये घरकुल सुरु करण्याकरिता मोहिम राबविण्यांत आलेली असुन त्या मोहिम अंतर्गत २०८५७ इतके घरकुल सुरु करण्यांत आलेले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव श्री.अंकित यांनी बोदवड, भुसावळ तालुक्यांत, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव. जामनेर, येथे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगांव. यांनी धरणगांव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी साप्रवि जि.प. जळगांव, यांनी जळगांव तालुक्यांत, प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी दौरा करण्यांत येऊन जास्तीत जास्त घरकुल पूर्ण करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये तालुक्यांतील सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, इ. सहभाग नोंदवुन लाभार्थ्यानाकडुन घरकुल सुरु करुन घेतली. दिलेल्या कार्यक्षेत्रात सातत्याने पाठपुरवा करुन विहित वेळेत घरकुल पूर्ण करावी. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उर्वरित सर्व घरकुले शुक्रवार दि. ७ रोजीपर्यंत टप्पा टप्पायांने सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमे मध्ये सर्व लाभार्थ्यांनी सहभागी होऊन आपली घरे पुर्ण करुन घ्यावीत. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव. जिल्हाधिकारी जळगांव यांनी केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT