जळगाव

Jalgaon Fraud News | ट्रेडिंग इन्व्हेसमेन्टचे आमिष दाखून महिलेसह तीच्या कुटुंबीयांची १ कोटी ५ लाखांची फसवणूक

गणेश सोनवणे

जळगाव : शहरातील महिलेस ट्रेडिंग मध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचे सांगून महिला व तिच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी बँक खात्यावरून रक्कम स्वीकारली. ही एक कोटी पाच लाख 23 हजार 341 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. 28 मार्च रोजी उघडकीस आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरांमधील हरेश्वर नगरमध्ये राहत असलेल्या सोनल भीमराव उपलवार वय 34 यांना व्हाट्सअप क्रमांकावर तीन जणांनी व्हाट्स ॲप द्वारे मेसेज करून ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च या दरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले. एवढेच नाही तर बाकीचे पैसे देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आले. गुंतवणुकीतून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनल उपलवार यांनी २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या तिघांसह व्हाटस्ॲप ग्रुपचा ॲडमीन अशा ४ जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT