जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेतात 'जिओ'चा टॉवर बसवण्यासाठी लागणाऱ्या एग्रीमेंट व आय जी एस टी यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगून 34 लाख 63 हजार 100 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर सेलमध्ये एक महिला व एक पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील निंबा गबा परदेशी यांना व्हाट्सअप वर जिओ कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर अंकिता श्रीवास्तव व राहुल कुमार या नावाने सोशल मीडिया व व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क करून दर महिन्याला वीस हजार रुपये महिना टावर लावल्यानंतर मिळेल. यासाठी आय जी एस टी व एग्रीमेंट साठी लागणारी रक्कम भरावी लागणार असे सांगून वेगवेगळ्या बँकेमध्ये वेळोवेळी 34 लाख 63 हजार 100 रुपयाची रक्कम स्वीकारली. ती रक्कम परत मिळत नसल्याने या प्रकरणी निंबा परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोन्ही विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे करीत आहे.