जळगाव : जळगाव अग्निशामन दलाच्या ताफ्यात नवीन सहा वाहने आली असून शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सोमवारी (दि.२७) जिल्ह्याला ही वाहने देण्यात आली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकाऱ्यांना नवीन वाहनाची प्रतिकात्मक चावी देत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार राजू भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.