जळगावः जामनेर तालुक्यात शहापूर येथे शेतकऱ्याने दोन हात करत जिंवत पकडलेल्या बिबट्याला घेऊन जाताना वनविभागाचे कर्मचारी 
जळगाव

Jalgaon Leopard attack -बिबट्याशी थेट भिडला अन् जिवंत पकडला

जळगावच्या तरुण शेतकऱ्याचे दोन हात; जखमी अवस्थेतही धाडस

पुढारी वृत्तसेवा

जळगावः जामनेर तालुक्यातील शहापूर येथे एका बिबट्याने तरुण शेतकऱ्यावर अचानक हल्ला चढवला. मात्र, घाबरून न जाता या तरुणाने प्राणाची बाजी लावत बिबट्याशी थेट दोन हात केले. अत्यंत अंगावर काटा आणणाऱ्या या झटापटीत स्वतः गंभीर जखमी झालेला असतानाही या तरुणाने बिबट्याला जिवंत पकडले. मुकेश नाना डोंगरे (वय ३२, रा. शहापूर, ता. जामनेर) असे या घाम फोडणाऱ्या धाडसी तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मुकेश सकाळी आपल्या शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. त्याने विजेच्या वेगाने बिबट्याला हाताने जोरदार ठोसे दिले. मुकेशच्या प्रतिहल्ल्याने बिबट्या गांगरला.

हीच संधी साधत मुकेशने आपल्या मजबूत हातांनी पक़डत त्याला जमिनीवर पाडले आणि नंतर आपल्या पोलादी बगलेत त्याची मान घट्ट पकडून ठेवली. शेतकरी तत्काळ धावले आणि त्यांनीही बिबट्याचे चारही पाय पकडून ठेवले. बिबट्याबरोबरील या जीवघेण्या लढाईत गंभीर जखमी झालेल्या मुकेशवर जामनेर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्या मादीचा ४ तासांतच मृत्यू

बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाने जामनेर कार्यालयात आणले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्या पाचारण करण्यात आले होते. मात्र, तपासणी सुरू असतानाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याला मृत घोषित केले. बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अंतर्गत रक्त्तस्रावमुळेच मादीचा मृत्यू झाल्याची माहिती जामनेरचे वनपरिक्षेत्राधिकारी सूरज आवारे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT