School  file
जळगाव

जळगाव | महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल तरी विद्यार्थ्यांची पाठ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | महानगरपालिकेच्या शाळांनी गेल्या काही वर्षांत डिजिटल शिक्षणाच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामध्ये स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, आणि ऑनलाइन शिक्षण साधनांचा समावेश आहे. डिजिटल सुविधा उपलब्ध करून शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, तरीही विद्यार्थी संख्या कमी आहे.

जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेच्या 23 शाळांपैकी 20 शाळा डिजिटल झालेले आहेत तर तीन शाळा मोबाईल डिजिटल आहेत तरीसुद्धा विद्यार्थ्यांची संख्या मराठी शाळेमध्ये नगण्य आहे.

डिजिटल सुविधांचा मर्यादित वापर होत आहे.शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी या सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसेल किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण पुरेसे मिळाले नसेल, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळत नाही. यामुळे पालकांचा विश्वास कमी झालेला आहे. हा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी यावर्षी शिक्षण अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहेत .यात मनपा शाळांमधील डिजिटल सुविधा आणि त्यांचे फायदे याबद्दल

माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहे.

मनपा शाळा या प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असल्याची समजूत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे या शाळांकडे फारसे आकर्षित होत नाहीत

डिजिटल सुविधा असूनही जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल किंवा सर्वांगीण विकास अपेक्षेनुसार नसेल, तर पालक अन्य पर्याय शोधतात. मनपा शाळांमधील निकाल आणि गुणवत्ता सुधारण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे.

खासगी शाळांचे आकर्षण

जळगाव शहरात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली आहे. पालकांना असे वाटते की, खासगी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा चांगल्या असतात, त्यामुळे ते आपल्या मुलांना तिथे पाठवण्यास प्राधान्य देतात. याचा परिणाम मनपा शाळांवरील पटसंख्येवर होतो.

डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

गुणवत्ता वाढ:

शैक्षणिक निकाल सुधारणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे.

पालकांचा सहभाग:

पालकांना शाळेच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे, जेणेकरून त्यांचा विश्वास वाढेल.जळगाव मनपाच्या शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही; त्याला शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक विश्वासाची जोड द्यावी लागेल.

मनपा एकूण शाळा -२३

डिजिटल शाळा -२०

मोबाईल डिजिटल -०३

१) खासदार यांच्या निधी मधून एकूण 13 शाळांना प्रोजेक्टर देण्यात आलेले आहे.

२) एमपीएसपी कडून एक शाळेला प्रोजेक्टर व तीन शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आलेले आहे.

३) एचडीएफसी बँक जळगाव कडून दोन शाळांना स्मार्ट बोर्ड देण्यात आलेला आहे.

४) एकूण पाच मनपा. शाळांमध्ये कॉम्प्युटर ICT लॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT