Sexual abuse of daughter by father
वृद्धाकडून मुलीवर लैगिंक अत्याचार Pudhari File Photo
जळगाव

जळगाव : वृध्दाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अमळनेर तालुक्यातील गावात मुकबधिर आसलेल्या १२ वर्षीय मुलीचा फायदा घेत मुलीसोबत अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एका वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलीचे आईही मजूरी कामासाठी अहमदनगर येथे गेलेल्या होत्या. याचा फायदा घेत १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा संशयित आरोपी राजधर अंबर सैंदाणे (वय ७०) याने पिडीत मुकबधिर मुलगी ही अंगणात खेळत असतांना तिला घरात बोलावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार गावातील एका आजीने फोन करून पिडीत मुलीच्या आईला सांगितला. त्यानुसार तिची आई घरी आल्यानंतर बुधवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपी राजधर सैंदाणे या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.

SCROLL FOR NEXT