Jalgaon Earthquake File Photo
जळगाव

Jalgaon Earthquake: जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद; राज्याबाहेर आढळला केंद्रबिंदू

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण परिसरासह भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांत जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Earthquake

जळगाव/भुसावळ: मध्य प्रदेशातील खरगोनजवळ आज (दि. १४) सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे सौम्य धक्के जळगाव जिल्ह्यातही जाणवले.

सकाळी ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हतनूर धरण परिसरासह भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांत जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक घरांतच होते. अचानक घरातील भांडी हलू लागली आणि जमिनीतून गूढ आवाज येऊ लागल्याने भूकंप झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी जीव मुठीत धरून घराबाहेर धाव घेतली. 'व्होल्कॅनो डिस्कव्हरी'च्या नोंदीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आली. त्याचे हादरे सीमावर्ती जळगाव जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले.

विशेषतः हतनूर धरण परिसर, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, चोपडा आणि यावल या तालुक्यांत धक्के जाणवले. सुदैवाने हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने जिल्ह्यात कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक बसलेल्या या हादऱ्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर भूकंपाचीच चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT