राष्ट्रीय महामार्गावर इच्छादेवी चौकात गॅस स्फोट Pudhari News Netwrok
जळगाव

जळगाव : गॅस स्फोट प्रकरणामुळे पोलीस निरीक्षक कंट्रोलरूम जमा

वैध गॅस रिफिलिंग सेंटर वरील स्फोटामुळे सात जणांचा बळी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील इच्छा देवी चौकाजवळ झालेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटर वरील स्फोटामुळे सात जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना शनिवारी (दि.7) सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून कंट्रोल रूम जमा (नियंत्रण कक्षात बदली) करण्यात आलेले आहे.

शहरातील इच्छा देवी चौक या ठिकाणी एका गाडीमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करण्यात येत होते. हे गॅस रिफिलिंग होत असताना स्फोट झाला व या स्फोटामध्ये आतापर्यंत सात जणांच्या बळी गेलेला आहे. सदर घटनेनंतर तत्काळ दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. मात्र या काळातच विधानसभा निवडणुका 2024 सुरू असल्याने निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने पोलीस निरीक्षक यांची बदली काही काळ थांबलेली होती. निवडणुक निकाल घोषित झाल्यानंतर शनिवारी (दि.7) पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची शनिवारी (दि.7) जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. सध्या दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार स्वीकारण्यात आला आहे. तर या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याची बदली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नियंत्रण कक्षामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा पोलीस स्टेशन मिळावे यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

नवीन अधिकारी आल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरामध्ये असलेले अवैध धंदे बंद करण्यात ते यशस्वी होतील का? हा ही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी अवैध व्यवसाय, जुगार अड्डे, गॅस रिफिलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. अनधिकृत गॅस रिफिलिंग भरणा करणारे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात एमआयडीसी परिसरात अजूनही सुरुच आहेत. गॅस रिफिलिंग सेंटर वरील स्फोट झाल्यानंतर अधिकृत गॅस स्टेशनवर वाहनधारकांच्या रांगा वाढ झालेली दिसून येते. मात्र आजही एमआयडीसी परिसरात चोरीच्या मार्गाने गॅस रिफिलिंग करून देण्यात येत आहेत, याला कोण आळा घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT