जळगाव : मंत्री झाल्यानंतर पहिलीच बैठक असून क्रीडा अधिकाऱ्यांनी डी पी आर मागितला आहे. त्यानंतर त्यावर काम करता येईल व जिल्ह्यासाठी व क्रीडा विभागात काय चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करता येतील असे वक्तव्य राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे दर तीन महिन्यांनी होणाऱ्या दिशाची बैठकीप्रसंगी बोलत होत्या. या बैठकीत केंद्रांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
क्रीडा विभागासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात क्रीडा विभागासाठी कोणकोणत्या योजनांची गरज आहे व त्या कशा उभ्या करता येतील. यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना चांगली जागा मिळावी. त्यांची प्रतिमा उंचवू शकेल यासाठी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यायला पाहिजेत. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी राज्यस्तरीय व नॅशनल सामने आयोजित करू शकतो तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर सोयी सुविधांचा कशाप्रकारे उपलब्ध करता येतील याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हाभरात तालुकास्तरावर क्रीडा संकुल बांधण्यात आलेली आहेत. त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती गरजेची आहे. त्यासाठी योग्य ती व्यवस्था उभी करायची आहे, म्हणजे त्यांचा मेंटेनन्स करण्यात मदत होईल असे देखील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.