जळगाव : जळगाव जिल्हा हा जसे राजकारणासाठी व उष्ण व तापमानासाठी प्रसिद्ध आहे तसेच आज जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका जळगाव यांच्यात रंगलेले वाक्युद्ध चांगलेच चर्चेत आले आहे. सभेनंतर बंद दरवाजाआड आयुक्त व अधीक्षक अभियंता यांच्यामध्ये शिवीगाळ कार्यक्रम रंगला. यामुळे अधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवून कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले.
या बंद दरवाजा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोळे खासदार स्मिता वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मनबा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन भावनांमध्ये 2024 25 या वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यांच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते यावेळी रस्ते व रस्त्यांच्या दर्जा व त्याच्यात कामकाजावर तसेच त्या ठिकाणी आमदारांना प्राचार्य न करणे बोर्ड न लावणे उद्घाटन न करणे यावरून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांना झापण्यास सुरुवात केली. त्यामध्येच मध्यस्थी करताना अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी हा प्रकार आम्ही कसे महानगरपालिकेवर उपकार करत आहोत. असे दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळी आयुक्त ढेरे यांनी तुम्ही सांगा कुठल्या अतिक्रमण काढायचे यावरून शाब्दिक चकमक व आमदारांचा भडकलेले रूप यावरून तो वाद खूपच वाढला.
बैठक संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी बंद दरवाज्यात चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावले मात्र तिथे अर्वाच्च्य शिवीगाळ दोन्ही अधिकाऱ्यांनी केली. यामुळे कामाकडे दुर्लक्ष मात्र आम्हीच खरे व आमची प्रतिष्ठा खरी यासाठी दोघे अधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसून आले. शेवटी अर्धा ते पाऊण तासाने बैठक संपली मात्र या बैठकीत झालेल्या अर्वाच्च्य शिवीगाळ प्रकरणामुळे अधिकारी किती माजलेले आहेत हे दिसून आले. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित असतानाही अशा प्रकारे एकमेकांना भाषा वापरतात हे धक्कादायक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत सोनवणे यांची दोन वेळा बदली झाली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांनी आपली बदली रद्द करून पुन्हा त्याच जागी रुजू झाले आहेत. बदलीचे आदेशही कसे रद्द करू शकतात, रद्द होतात हे यावरून दाखवून दिलेले आहेत.