जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे पाच व शिंदे सेनेच्या पाच जागा निवडून आलेले आहेत.भाजपचे दोन मंत्री असणार असून एक शिंदे सेनेचा असणार आहेत हे तीन मंत्री पद विधानसभेत जाणार असून एक केंद्राचे मंत्रीपद असे एकूण तीन मंत्रीपदे जळगाव जिल्ह्यातून निश्चित झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये जळगाव जिल्हा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये 11 पैकी पाच जागांवर भाजपा व शिंदे सेनेने आपला शिक्कामोर्तब केला आहे. लोकसभेमध्ये दोन्ही जागा भाजपने जिंकलेल्या आहेत.
नागपूर नंतर जळगाव जिल्ह्याचे एक अनन्यसाधारण महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले आहे. जिल्ह्याचे नव्हे तर राज्याच्या संकट मोचक असलेले गिरीश महाजन हे पुन्हा कॅबिनेट मंत्री पदी शपथ घेणार आहेत तर अनुसूचित जातीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालकमंत्री व सध्याला भाजपात असलेले संजय सावकारे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे तसेच शिंदे सेनेने आपले बाहुबली सिद्ध केल्यावर जळगाव जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद गुलाबराव पाटील यांच्या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे एक केंद्रीय मंत्री त्याचबरोबर राज्यातील विधानसभेत दोन मंत्री त्याचबरोबर युतीतील शिंदे सेनेचे मंत्री असे जळगाव जिल्ह्याला चार मंत्री लाभणार आहे.