जळगाव : रस्त्याच्या मजबुतीची यंत्राच्या साह्याने परीक्षण करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. समवेत सहायक नियोजन अधिकारी राहुल इघे व महानगरपालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी. (छाया: नरेंद्र पाटील) 
जळगाव

जळगाव : महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता तपासणी केली. तसेच तयार रस्ते झालेल्या गल्लीतील नागरिकांशी संवाद साधला, लोकांनी पूर्वीच्या रस्त्यामुळे खुप धुळ येत होती. आता मात्र स्वच्छ आणि धुळ नसल्यामुळे आरोग्यपूर्ण वाटते आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इघे, महानगर पालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रस्त्याची पाहणी करत असताना एका भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला असे विचारले.. त्यावेळी तो म्हणाला ' मी इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो, पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो.. आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते' असा अभिप्राय  भाजी विक्रेत्याने दिला.

एक सेवा निवृत्त नागरिक म्हणाले, पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली की, घरात धुरळा यायचा. मात्र आता नवीन रस्ता झाल्यापासून धुळ नाही, त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे. अशी प्रतिक्रिया दिली. एका ठिकाणी नाल्याच्या काठावर बरीच जागा सुटल्याने संभाव्य धोका जाणवत होता, याठिकाणी महानगरपालिकेला पेव्हरब्लॉक लावण्याच्या सूचना वरीष्ठांनी दिल्या होत्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढरा पट्टा मारण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मोजली रस्त्याची गुणवत्ता
रस्ता मजबूत झाला आहे की नाही, हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. ते हातात घेवून स्वतः त्याची मजबुती किती आहे हे मोजले जाते. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. रस्ते चांगलेच झाले पाहिजेत म्हणून नागरिक स्वतः रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कुठे कुठे झाले नवीन रस्ते
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यां : आदर्श नगर प्रभाग क्र 14, स्वामी समर्थ चौक ते पाटचारी पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा : आदर्श नगर प्रभाग क्र 14 सि स नं 444 रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : मेहरुण येथील प्रभाग क्रं 14 मधील अशोक किराणा चौक ते स नं 249 पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : प्रभाग क्रं 09 मुक्ताईनगर श्री जगताप यांचे घरापासून ते श्री पवार यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा : प्रभाग क्रं 07 सतीश पाटील यांच्या घरापासून ते अतुल भोळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता व काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : नानीबाई हॉस्पटील ते हेमू कलानी बगिचा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा : प्रदीप तळवेलकर यांच्या घरापासून ते  स्नेहल फेगडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता  व काँक्रीटीकरण असे एकूण सात रस्ते नवीन करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT