जळगाव : विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्राचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे 11 जागांवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये जळगाव शहर, रावेर, पाचोरा, अमळनेर या ठिकाणी त्रिशंकू तर चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर मतदारसंघात आमनासामना यासह काही ठिकाणी स्वकीय पक्षांचे किंवा युतीच्या पक्षाचे आवाहन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार आहे.
राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्याच्या अकरा जागांवर विद्यमान जळगाव जिल्ह्यात भाजपा. शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे वर्चस्व आहे. तर विद्यमान आमदारांना आव्हान देण्यासाठी आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आव्हान दिले आहे. तर यामध्ये वंचित बहुजन आघाडी व प्रहार संघटना यांनी सुद्धा आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. त्याचबरोबर मनोज जारंगे यांचे समर्थक सुद्धा पाचोर्यातून मैदानात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील आज 11 विधानसभा क्षेत्रांमध्ये जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या विधानसभा क्षेत्रामध्ये युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. तर काही आघाडीच्या उमेदवारांनी दाखल केलेले उर्वरित अर्ज हे दि. 28 व 29 रोजी मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहे
जळगाव शहर, रावेर, पाचोरा, अंमळनेर या विधानसभा क्षेत्रांमध्ये त्रिशंकू निवडणूक होणार आहे. जळगाव शहर यात भाजपा कडून सुरेश भोळे, उबाठा जयश्री महाजन, अपक्ष अश्विन सोनवणे, कुलभूषण पाटील.
रावेर- भाजपा अमोल जावळे, काँग्रेस धनंजय शिरीष चौधरी, प्रहार चे अनिल चौधरी, वंचित च्या शभिमा पाटील
पाचोरा- शिंदे गट किशोर पाटील, उबाठा वैशाली सूर्यवंशी, अपक्ष अमोल शिंदे, मराठा समाज हरिभाऊ पाटील.
अमळनेर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अनिल भाईदास पाटील, शरद पवार गट डॉ. अनिल शिंदे ,अपक्ष शिरीष चौधरी.
एरंडोल या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी आपल्या पुत्राला तिकीट घेतले असून शिवसेना शिंदे गटाकडून अमोल चिमणराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे.
तर आमना-सामना मध्ये जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, चोपडा जामनेर, चाळीसगाव या ठिकाणी थेट निवडणूकीचा सामना होणार आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये आजी- माजी पालकमंत्री शिवसेना शिंदे गट गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गुलाबराव देवकर अशी लढत होणार आहे.
मुक्ताईनगर- शिवसेना शिंदे गट आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रोहिणी खडसे यांच्यात लढत होत आहे.
चोपडा येथे शिवसेना शिंदे गट प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राजू तडवी आयात केलेले उमेदवार यांच्यात सामना होणार आहे.
जामनेर - भाजपा संकट मोचक गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्राध्यापक दिलीप खोपडे यांच्यात सामना रंगणार आहे.
चाळीसगाव या ठिकाणी भाजपा मंगेश चव्हाण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उन्मेष पाटील यांच्यात लढत होत आहे.
भुसावळ या ठिकाणी भाजपाचे उमेदवार संजय सावकारे, वंचित चे जगन सोनवणे, काँग्रेसला उमेदवारी गेलेली असल्याने उमेदवारी अजून जाहीर झालेला नाही.