Jalgaon
येत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून धनंजय चौधरींंचे नावही जाहीर.  Pudhari Photo
जळगाव

Jalgaon | कॉंग्रेसच्या बड्या नेत्याकडून मुलाच्या लॉन्चिंगसाठी सोहळ्याचा घाट

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : विधानसभा निवडणुकीला अजून अडीच ते तीन महिन्याचा अवधी असताना जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांचा लॉन्चिंग सोहळा हा कृतज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत करून घेतला. येत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून धनंजय चौधरींना जाहीर करून टाकले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांची मोहर सुद्धा लागली. आजोबाच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या दिवशी नातवाचे राजकारणात लॉन्चिंग करून शिरीष चौधरी यांनी एक पाया रोवला मात्र हे लॉन्चिंग किती पर्यंत यशस्वी होणार हे सर्व काही मतदारांवर अवलंबून आहे. आघाडीच्या लोकसभेच्या नेत्याला रावेर मधून पाहिजे तशी साथ मिळाली नाही परंतु विधानसभेला ती साथ मिळणार का हे पाहणे महत्वाचे राहील.

केळीसाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनामुळेही संपूर्ण जगात ओळखला जातो. याच परिसरात धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी, यासारखे दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द येथूनच सुरू केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उच्च स्थानापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला. मधुकरराव चौधरी यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे मुलगा व विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी पुढे सुरू ठेवला. मात्र शारीरिक अस्वस्ततेमुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेत मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञ सोहळा आयोजित करून मुलाच्या राजकीय कारकीर्दीला त्यांनी सुरुवात करून दिली. या सुरुवातीलाच थेट विधानसभा क्षेत्राचे तिकीट त्यांनी काँग्रेसचे नेत्यांकडून काढून आपल्या मुलाच्या पदरात पाडून घेतले. तसेच जळगाव जिल्ह्यातील इतिहासात निवडणुका लागण्यापूर्वी तेही दोन ते तीन महिने अगोदरच आपल्या मुलाची उमेदवारी काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीर करून घेतले. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामधून रावेर विधानसभा क्षेत्र हे शिरीष चौधरी यांच्या मुलगा धनंजय चौधरी याच्यासाठी आजपासूनच राखीव करण्यात आले.

सोहळ्याला काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, राजेश टोपे, सतेज पाटील यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी खिरोदा मध्ये उपस्थिती देऊन आपल्या भाषणातून जाहीर करून टाकले व कामाला लागण्याचे सांगून दिले. त्यामुळे काँग्रेसने तीन महिन्यात आधीच रावेर विधानसभा क्षेत्रात आपली तयारी धनंजय चौधरी च्या माध्यमातून सुरू केलेली दिसून येत आहे. मात्र लोकसभेला याच विधानसभा क्षेत्रातून आघाडीचे उमेदवार असलेले श्रीराम पाटील यांना मताधिक्य कमी पडलेले होते. मग हा भार कसा कमी करण्यात येईल या ठिकाणी भाजपा शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधून कोणता पक्ष धनंजय चौधरींना टक्कर देणार, कोण अनुभवी त्यांच्यासमोर राहील हे पाहणे महत्त्वाचे राहील.

SCROLL FOR NEXT