जळगाव : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची 'मिनी विधानसभा' समजल्या जाणाऱ्या 'दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.' च्या पंचवार्षिक निवडणूक (सन २०२६ ते २०३१) प्रक्रियेत राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यात गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी विविध मतदारसंघांतून एकाच दिवशी तब्बल १५६ नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहेत.
जिल्ह्याच्या सहकार आणि ग्रामीण दुसरीकडे इच्छुकांची गर्दी वाढतच असून आज दिवसभरात आणखी १०२ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून, आतापर्यंत विक्री झालेल्या एकूण अर्जांची संख्या तब्बल ७३७ वर जाऊन पोहोचली आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा (विकासो) संस्था, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्गातील जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
तालुकानिहाय विकासो गटात चुरस
प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. संस्था व संयुक्त शेती संस्था मतदारसंघातील (प्रत्येक तालुक्यासाठी एक प्रतिनिधी) जागांसाठी स्थानिक पातळीवर जोरदार शक्तिप्रदर्शन झाले.
धरणगाव तालुका : विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांच्या पत्नी सोनल संजय पवार यांनी तब्बल चार अर्ज दाखल करून जोरदार मोर्चेबांधणी दर्शवली असून, विद्यमान अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांचाही अर्ज दाखल झाला आहे.
पाचोरा तालुका : विद्यमान आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांनी चार अर्ज दाखल केले असून, सतीश परशराम शिंदे यांनी दोन अर्ज भरले आहेत.
अमळनेर तालुका : विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दोन तर आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत.
रावेर तालुका : राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, रमेश नगराज पाटील, गोंडू रामदास महाजन, योगीराज गबाजी पाटील, राजीव रघुनाथ पाटील आणि नंदकिशोर भागवत महाजन आदींनी अर्ज दाखल केले आहेत.
चोपडा तालुका : मनोज अशोक सनेर, नंदकिशोर भानुदास पाटील, घनशाम ओंकारलाल अग्रवाल, सुरेश शामराव पाटील, नितीन रामदास पाटील व सुनील दगडू महाजन यांचे अर्ज दाखल झाले.
भुसावळ व इतर तालुके : भुसावळ विकासो गटातून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी संजय सावकारे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय भडगावमधून सोमसिंग खुमानसिंग पाटील, पूनम प्रशांत पाटील, प्रकाश अमृत पाटील; यावलमधून रामदास गोंडू पाटील, विनोदकुमार पंडितराव पाटील, सागर राजेंद्र महाजन; जामनेर मधून ज्योती नाना पाटील, रघुनाथ सखाराम पाटील; पारोळ्यातून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील; एरंडोलमधून विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील; बोदवडमधून गोपाल बाबुराव गंगतीरे, रुपेश दामोदर गांधी आणि मुक्ताईनगरमधून देवयानी चंद्रकांत देशमुख व विनोद रामदास तराळ यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
राखीव जागांवरही चढाओढ
महिला प्रतिनिधी मतदारसंघ : महिला राखीव गटात मोठी चुरस पाहायला मिळत असून ज्योती नाना पाटील, माजी महापौर जयश्री सुनील महाजन, इंदिराताई भानुदास पाटील, रेखा सतीश पाटील, मनिषा अनंतराव सूर्यवंशी, रोहिणी प्रशांत पाटील, निर्मला नाना पाटील, अमृता मनोज महाजन, वैशाली किशोर पाटील, वंदना अशोक चौधरी यांच्यासह २३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (ओबीसी) : माजी आमदार डॉ. सतीश भास्करराव पाटील, रोहन सतीश पाटील, माजी महापौर जयश्री सुनील महाजन, राजाराम नागो सोनार, प्रताप हरी पाटील, पालकमंत्री चे सुपुत्र प्रताप गुलाबराव पाटील, सुनील दामोदर पाटील, पराग वसंतराव मोरे यांच्यासह १९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJ/NT/SBC) : १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून यात विशालसिंग कोमलसिंग पाटील, प्रकाश मेहताबसिंग राठोड, सुनील रमेश काळे, विकास ज्ञानेश्वर वाघ, दिलीप उत्तमराव धनगर, अविनाश प्रकाश जाधव आदींचा समावेश आहे.
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) : चंद्रकांत बळीराम सोनवणे, प्रवीण नाना सुरवाडे, प्रशांत सुकदेव निकम, साहेबराव कौतिक सैंदाणे, अविनाश मुकुंदराव भालेराव आणि अलका जुलाल सूर्यवंशी आदींचे अर्ज दाखल झाले आहेत.
इतर सहकारी संस्था मतदारसंघ : २१ इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सहकार पॅनल की सर्वपक्षीय समझोता होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.