AK-47
AK-47 ची काडतुसे जवळ बाळगणाऱ्या उपअभियंत्याला पकडलं File Photo
जळगाव

Jalgaon Crime|AK-47 ची काडतुसे जवळ बाळगणाऱ्या उपअभियंत्याला पकडलं

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : भुसावळ तालुक्यात असलेल्या वरणगाव फॅक्टरी मधील उपअभियंता दुपारी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्याकडून एके 47 मध्ये वापरली जाणारी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी ( ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये) कामावर असलेले सतीश जयसिंग इंगळे (वय 52) हा उप अभियंता बुधवारी दुपारीच्या सुमारास जेवणासाठी बाहेर जाताना त्याची दुचाकी क्रमांक (एम एच 19 एटी 1504) या गाडीच्या हेडलाईटच्या कव्हर खाली सुरक्षारक्षक यांना जिवंत काडतूस आढळून आली. त्यांनी तात्काळ सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वरणगाव पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. एपीआय भरत चौधरी यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी येऊन सतीश इंगळे यांच्या जवळून एके 47 रायफल मध्ये वापरल्या जाणाऱ्या जिवंत पाच काडतून जप्त केल्या. कार्यप्रबंधक संभाजी सुधाकर पावडे यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT