बँक फोडण्याचा डाव फसला   File Photo
जळगाव

Jalgaon Crime | बँक फोडण्याचा डाव फसला ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

भुसावळ तालुका पोलीसांत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात भरवस्तीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. हा प्रकार बॅंक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील भररस्त्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची शाखा आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहीले जाते. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. परंतू चोरट्यांचा चोरी करण्याचा डाव अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले. दरम्यान, हा सर्व प्रकार बँक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT