Crime News Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | भांडण मोठ्यांचे जीव गेला चिमुकल्याचा! : हाणामारी पाहत असताना दांडक्याचा फटका बसला डोक्यात!

आव्हाने शिवारातील घटना, पोलिसांनी केली आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाने शिवारात दोन व्यक्तींमधील पैशांच्या वादातून झालेल्या मारहाणीत दांडक्याचा फटका सहा वर्षीय चिमुकल्याला लागून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वंश सुनील बारेला (वय ६, रा. उनपदेव, ता. चोपडा) हा आपल्या कुटुंबासह आव्हाने शिवारातील म्हशींच्या गोठ्यावर राहत होता. बारेला कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून गोठा व शेताच्या राखणाचे काम करत आहे.

याच गोठ्याजवळ आरोपी मच्छिंद्र रमण पाटील (वय ३२, रा. आव्हाने) याची पानटपरी आहे. गोठ्यात काम करणारा भावेश धनगर याच्याकडे आरोपीचे ९०० रुपये येणे होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीदरम्यान आरोपीने जवळील लाकडी दांडक्याने भावेश धनगर याच्यावर वार केला. मात्र, भावेशने तो वार चुकवला. त्याचवेळी भांडण पाहत जवळ उभा असलेल्या वंश बारेला याच्या डोक्यावर दांडक्याचा फटका बसला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मच्छिंद्र रमण पाटील याला लाकडी दांडक्यासह ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT