जळगाव

Jalgaon crime | अट्टल गुन्हेगार आमनेसामने; चौघे पोलीसांच्या ताब्यात

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेल्या हॉटेल रूपाली समोर दोन गटातील अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले. याठिकाणी झालेल्या वादात एकाने गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला आहे. सदर प्रकार शहर वाहतूक पोलीसांच्या  लक्षात आल्याने त्यांनी चौघांसह दोन वाहने व गावठी पिस्तूल जप्त केले. त्यांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली समोर चारचाकी वाहन (एमएच १८ बीआर ९००९) आणि दुचाकी (एमएच १९ ईसी ६७२८) वरील बसलेले दोन गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ सोनू गणेश चौधरी, चेतन उर्फ भैय्या रमेश सुशीर आणि अतुल कृष्ण शिंदे हे अट्टल गुन्हेगार दोन गटात एकमेकांसमोर आले. दोन्ही वाहने थांबवून त्यांच्यात वाद निर्माण झाला. यातील एकाने गावठी कट्टा काढून रोखण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, कर्मचारी तुषार जावरे, योगेश पाटील, महेश महाले, सुनिल तडवी, नरसिंग पाडवी, विकास पवार, रवि पाटील, मन्साराम महाजन, किरण मराठे हे ड्यूटीवर असतांना यांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून गुन्हेगारांमधील वाद मिटवत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहने ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान हा वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समोर आलेले नाही.

SCROLL FOR NEXT