जळगाव : शहरातील आकाशवाणी ते सिंधी कॉलनी रोडवर गोधडी वाला अपार्टमेंट समोर दोन अज्ञातांनी पोलीस असल्याचे भासवून एका महिलेच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन तिला दोन नकली बांगड्या देऊन त्या महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 29 रोजी 3.45 वाजेला पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (वय वर्ष 75 राहणार गणेश नगर चनार अपार्टमेंट जवळ) या आकाशवाणी ते सिंधी कॉलनी रोडवर गोधडी वाला अपार्टमेंट समोरून जात असताना दोन अनोळखी लोकांनी पोलीस असल्याचे भासवून त्या महिलेचा विश्वास संपादन केला व हातातील पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या त्यांच्या ताब्यात घेऊन व दोन नकली बांगड्या देऊन पुष्पाबाई लालचंद बखतवाणी यांची फसवणूक केली. या प्रकरणी पुष्पाबाई यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात दोन अज्ञात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेअर कॉन्स्टेबल वंदना राठोड ह्या करीत आहे.
अमळनेर शहरातील धुळे रोडवर लगत असलेल्या राजू सिंग परदेशी यांच्या घराचे बांधकाम सिमेंटच्या गोण्या देण्यावरून त्याच्या बँकेच्या खात्यावर वेळोवेळी दोन लाख 27 हजार रुपये रक्कम देऊनही सिमेंट पाठवले नाही व फोन बंद करून ठेवला म्हणून फसवणूक झाल्याच्या गुन्हा अमळनेर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील राजू सिंग बाबू सिंग परदेशी यांनी धुळे रोड लगत असलेल्या प्लॉटचे बांधकाम सुरू केलेले आहे. या काळात सुजित वर्मा याने व्हाट्सअप नंबर व वेगळ्या फोनवरून त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अंधेरी कोटक महिंद्रा बँक खाते, एचडीएफसी बँक अर्बन बँक आरटीजीएस 800 गोण्या सिमेंट साठी दोन लाख 27 हजार रुपये जमा केले. पैसे घेऊनही सिमेंट मिळत नसल्याने फसवणूक झाली म्हणून राजू सिंग परदेशी यांनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे .पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.
हेही वाचा :