गुटख्याचे वाहन सोडल्याने पीएसआयसह चार पोलीस निलंबित file photo
जळगाव

Jalgaon Crime News | गुटख्याच्या वाहनास अभय दिल्याने पोलीसांवर निलंबनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात नव्हे तर राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असून गेल्या काही दिवसांमध्ये महानिरीक्षक पोलीस यंत्रणा यांनी गुटख्याचे वाहनांवर कारवाई केली आहे. याचप्रकारे ताब्यात घेण्यात आलेले गुटख्याचे वाहन मात्र परस्पररीत्या सोडून दिल्याप्रकरणी महानिरीक्षकांनी पीएसआय सह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीला शासनाने बंदी घातली आहे तसे आदेश जीआरही काढलेले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रासपणे विक्री होते. त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या बॉर्डवरील मुक्ताईनगर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी किंवा वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले आहे.

गेल्या काही दिवसात महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांच्या पथकाने गुटख्याचे मोठे कंटेनर पकडले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सुद्धा कारवाई करून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर खुद्द मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी चार चाकी वाहनातून होणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलीस स्टेशनला आणले होते. मात्र पुढील कोणतीही कारवाई न करता ते वाहन परस्पर सोडून देण्यात आले. पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या संदर्भात सखोल चौकशी करून सदर प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणारे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कार्यरत उपनिरिक्षक राहूल बोरकर यांच्यासह हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी व निखील नारखेडे तसेच नाईक सुरेश पाटील यांना निलंबीत केले आहे. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पाच कर्मचारी निलंबीत झाले आहेत.

याबाबत मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी निलंबित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे जिल्ह्यात काही पोलीसांचा वरदहस्त मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT