Prostitution Pudhari
जळगाव

टॉवर चौकात नामांकित लॉजवर पोलिसांचा धाड

jalgaon Prostitution news | वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; डमी ग्राहकाच्या जाळ्यात मॅनेजर अडकला, 'एलसीबी'ची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरांमधील शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजमध्ये पैशांचे आमिष दाखवून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.९) रात्री छापा टाकला. अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर पीडित महिलांची या मधून सुटका केली .

टॉवर चौकातील एका लॉजवर काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त सापळा रचला.

पोलिसांनी या रॅकेटला पकडण्यासाठी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. या ग्राहकाने लॉजमधील व्यक्तीशी पैशांची बोलणी केली आणि व्यवहार ठरताच पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली. यावेळी तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे रंगेहात उघड झाले.

या कारवाईत वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य आरोपी राजू मोतीराम जोशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध 'पीटा' कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटची पाळेमुळे जळगाव जिल्ह्यात आणखी कुठे पसरली आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची पोलिसांनी सुटका केली असून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. "शहरात कुठेही असे अनैतिक प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

यांनी केली कामगिरी

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड व त्यांच्या एलसीबी आणि एएचटीयू पथकाने फत्ते केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT