दुचाकी चोरणाऱ्या भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर येथे राहत असलेल्या संशयितास ताब्यात घेताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस.  (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

Jalgaon Crime News | मोटार सायकल चोरी करणारा अखेर जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर येथे राहत असलेल्या संशयित आरोपीकडे दोन्ही मोटरसायकल चोरीच्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. सदरील मोटरसायकल या जळगाव तालुका अडावद पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

जिल्हयात मोठया प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक कमलाकर बागुल, गोपाळ गव्हाळे, रणजित जाधव, सचिन पोळ यांना मिळालेल्या माहितीनुसार मोटार सायकल चोरी करणारा संशयीत आरोपीबद्दलची माहिती गोळा करण्यात आली.

मोटार सायकल चोरी करणारा आरोपीचा भुसावळ शहरात शोध घेत असतांना संशयीत आरोपी अल्तमस गणी तडवी (24, रा. मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर, भुसावळ) याच्याजवळ दोन मोटार सायकली चोरीच्या असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे संशयिताचा भुसावळ शहरात शोध घेतला असता तो भुसावळ शहरात राहत असलेल्या परिसरात हिरो कंपनीची HF डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच-३० बी एच ८००२ ही चोरीची असून तो ही मोटार सायकल घेवून खुलेआम फिरत होता. त्यास ताब्यात घेवून त्याच्या घरातून पुन्हा एक चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

चोरीच्या दोन्ही मोटार सायकली बाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात CCTNS नं. २६७/२०२४ भादंवि क.३७९ व अडावद पो.स्टे. CCTNS नं.१३२/२०२४ भादंवि क.३७९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी अल्तमस गणी तडवी यास ताब्यात घेवून त्यास जळगाव तालुका गुन्हयामध्ये पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT