जळगाव

Jalgaon Crime News | भुसावळात पिस्टलचा धाक दाखवून 12 लाखांची जबरी चोरी, चौघांना अटक

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा – भुसावळ तालुका हद्दीतील महादेव माळ ते मांडवा दिगर फाटा येथे मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात मोटार सायकल स्वारांनी पिस्टलचा धाक दाखवुन 12 लाख रुपयांची जबरी चोरी केली होती. याप्रकरणी तपासाची चक्रे फिरली असता 4 संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यातील दोन अल्पवयीन आहेत.  या प्रकरणी भुसावळ तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 3 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जामनेर येथील भीमराव लक्ष्मण तायडे हा भुसावळ येथे तेलाची विक्री केल्यानंतर 12 लाख रुपयांची कॅश मोटार सायकलने घेऊन जात असतांना सांयकाळी 06.30 वाजेच्या सुमारास कुन्हा पानाचे गांवाचे पुढे महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्यांचे दरम्यान मोटार सायकलवर तोंडाला रुमाल बांधुन आलेल्या तीन अज्ञात मोटार सायकल स्वारांनी भीमराव यांची मोटार सायकल थांबवुन त्यांना पिस्टलचा धाक दाखवुन 12 लाख जबरीने हिसकावुन जामनेरच्या दिशेने पळून गेले होते. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हयांतील अज्ञात फरार आरोपींचा शोध घेणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. व गुन्हयांचा तपास सपोनि विशाल पाटील नेमणुक भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांचे कडे देण्यात आलेला होता.

गुन्हयातील अज्ञात आरोपींचा गोपनीय बातमीदार व तांत्रीक  विश्लेषणाच्या सहाय्याने सागर बबन हुसळे रा. zic फेकरी ता. भुसावळ, अतुल दिपक खेडकर रा. लहुजी नगर जामनेर ता. भुसावळ व दोन अल्पवयीन बालक असे निष्पन्न केले. आरोपी व अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेवुन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला आणुन त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिली. त्यांचे कडुन गुन्हयांतील जबरीने चोरून नेलेली रक्कमेतून रोख रक्कम 10 लाख रुपये व गुन्हयात वापरलेली चार चाकी बोलेरो गाडी किंमत अंदाजे 5 लाख रुपये किमतीची असा एकूण पंधरा लाखाचा किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सपोनि विशाल पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पथकातील पोहेकों उमाकांत पाटील, पोहेकों रमण सुरळकर, पोकों योगेश माळी, पोकों प्रशांत परदेशी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पथकातील पोहेकों युनुस मुसा शेख, पोहेकों दिपक जाधव, पोहेकों प्रेमचंद सपकाळे, पोना कैलास वाविस्कर, पोना नितीन चौधरी, पोकों राहुल महाजन, पोकों उमेश बारी, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे पथकातील सपोनि अमोल मोरे, सफौसंजय हिवरकर, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोहेकों कमलाकर बागुल, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकों किशोर राठोड, पोहेकों प्रवीण मांडोळे, पोना रणजित जाधव, पोना श्रीकृष्ण देखमुख, पोकों प्रमोद ठाकुर यांचे पथकाने कार्यवाही केलेली आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT