घरफोडी प्रकरण Pudhari Photo
जळगाव

Jalgaon Robbery | जळगावात चोरट्यांचा सुळसुळाट : बंद घर फोडून दागिने लंपास, भररस्त्यात वृद्धेची पोत हिसकावली

अयोध्या नगरात घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Elderly woman robbed Jalgaon

जळगाव : जळगाव शहरात चोरट्यांचे धाडस पुन्हा एकदा समोर आले असून, भरवस्तीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. एका घटनेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने हिसकावण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत बंद घर फोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाराणा प्रताप हायस्कूल परिसरात झपाट्याने चोरी

शहरातील वर्दळीच्या महाराणा प्रताप हायस्कूलसमोरील रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली. निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेमनगर) या पती व भावासह बेंडाळे नगर येथून जेवण करून पायी घरी परतत होत्या. शाळेजवळील गल्लीत पोहोचताच, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (अंदाजे किंमत ९० हजार रुपये) जोरात हिसकावून पलायन केले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उल्हास सरहोटे तपास करत आहेत.

अयोध्या नगरात बंद घर फोडून चोरी

दरम्यान, अयोध्या नगर परिसरातही घरफोडीची घटना घडली. पुरुषोत्तम पंढरी पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातून ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल (किंमत ३५ हजार रुपये) तसेच १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या असा एकूण ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

शहरात पोलिसांकडून गस्तीचे दावे केले जात असतानाच, भररस्त्यात व वस्तीत चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः वृद्ध महिलांना लक्ष्य केले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT